पीडब्ल्यूडी मैदान बनले मद्यपींचा अड्डा

सांगवी – नवी सांगवी व जुनी सांगवी दरम्यान असलेले पीडब्ल्युडी मैदान दिवसा परिसरातील मुलांसाठी खेळाचे मैदान दिसत असले, तरी रात्री येथे प्रेमी युगुल व दारुड्यांच्या वावराने नागरिक हैराण झाले आहेत. सांगवी परिसरातील महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक या मैदानात सकाळ सायंकाळी फिरण्यासाठी येत असतात. याच मैदानात रात्री आठ वाजल्यानंतर अनेक दारुडे दारू पिण्यासाठी आडोशाला बसलेले असतात. तसेच प्रेमीयुगुल मोकळ्या मैदानात कार लावून आडोसा बनवतात, तर मैदानात असलेले बॅडमिंटन हॉल, पाण्याची टाकी, महापालिकेचे सावतामाळी उद्यान, जलसंपदा कार्यालय यांच्या भिंतीच्या आडोशाला गैरप्रकार होताना दिसतात. ठिकाणी दारूच्या बाटल्यांच्या काचेचा कचरा पसरलेला दिसतो.

अगदी हाकेच्या अंतरावर सांगवी पोलीस ठाणे असून, येथील पोलीस गस्त घालून जाताच पुन्हा हे दारुडे आपले बिनधास्तपणे बस्तान मांडतात. हे दररोजचे चाललेले दिसते. या मैदानातून काही नागरिक नवी सांगवी ते जुनी सांगवी चालत जातात तर काही नागरिक व्यायामासाठी फिरण्यासाठी येत असतात. उद्यानात लहान मुले खेळायला येतात. त्यामुळे दारुड्यांचा नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.