तैवानशी संपर्काबाबतचे निर्बंध अमेरिकेने उठवले

वॉशिंग्टन – अमेरिका आणि तैवान दरम्यानच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या संपर्कांबाबत अमेरिकेने स्वतःहून घातलेले निर्बंध आज अअमेरिकेने उठवले. अमेरिकेचे संरक्षण मंत्री माईक पॉम्पेओ यांनी याची घोषणा केली.

चीनला सुखावण्यासाठी तैवानच्या अधिकाऱ्यांबरोबर संपर्क न ठेवण्याचे धोरण अमेरिकेने स्वीकारले होते. ते आता समाप्त करण्यात आले आहे. मात्र ट्रम्प प्रशासनाने सत्तेवरून पायउतार होण्याच्या काही दिवस आगोदर उचललेल्या या पावलामुळे चीन आणि अमेरिकेतील तणाव अधिक वाढणार आहे. तैवानला चीन आपलाच दूरचा भूभाग मानत आहे. मात्र तैवानचे नेते तैवानला स्वायत्त मानत आहेत.

तैवानच्या अधिकाऱ्यांबरोबर संपर्क न ठेवण्याच्या धोरणामुळे अमेरिका-तैवान दरम्यानचे संबंध गुंतागुंतीचे बनले होते. मात्र तैवान 1949 मध्ये चीनपासून वेगळा झाल्यापासून अमेरिका-तैवान जवळचे संबंध आहेत. मात्र चीनबरोबर तणाव वाढायला नको, म्हणून अमेरिकेने या मैत्री संबंधांचे प्रदर्शन केले नव्हते.

आता या धोरणाचा फेरआढावा अमेरिकेने घेतला आहे आणि हे स्वयंघोषित निर्बंध मागे घेतले जात अहेत, असे पॉम्पेओ यांनी म्हटले आहे. अमेरिका आणि तैवान दरम्यानचे संबंध अधिक सुरळीत करण्यासाठी संयुक्‍त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत केली क्राफ्ट या तैवानला भेट देणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.