Taiwan Earthquake| तैवानमध्ये बुधवारी झालेल्या भूकंपाने मोठे नुकसान झाले आहे. या शक्तिशाली भूकंपात 10 जणांचा मृत्यु झाल्याची माहिती समोर येत आहे. तर 1070 जण जखमी झाले आहेत. तैवानची राजधानी तैपेईमध्ये बुधवारी सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.
भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.5 इतकी मोजली गेली, जी धोकादायक श्रेणीत मोडते. हा भूकंप गेल्या 25 वर्षांतील सर्वात शक्तिशाली भूकंप मानला जात आहे, त्यामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले असून अनेक लोक दुर्गम भागात अडकले आहेत.
तैवानमध्ये राहणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना मदत आणि मार्गदर्शनासाठी हेल्पलाइनही जारी करण्यात आली आहे. तैवानला झालेल्या शक्तिशाली भूकंपाच्या एका दिवसानंतर गुरुवारी बचाव कर्मचारी बेपत्ता लोकांच्या शोध घेतला जात आहे. दरम्यान, मृत 10 लोकांपैकी किमान चार तारोको राष्ट्रीय उद्यानात होते.
नॅशनल फायर एजन्सीच्या मते, सुमारे 700 हून अधिक लोक बेपत्ता आहेत, त्यापैकी 600 हून अधिक लोक तारोको येथील सिल्क प्लेस नावाच्या हॉटेलमध्ये अडकले आहेत. परंतु हे सर्व लोक सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे.
तैवानमध्ये भूकंपाचे धक्के का जाणवतात ?
तैवान पॅसिफिक महासागराच्या ‘रिंग ऑफ फायर’ जवळ स्थित आहे. या भागात नेहमीच भूकंपाचे धक्के बसतात. ‘रिंग ऑफ फायर’ प्रशांत महासागराच्या किनाऱ्यापासून सुरू होते अन् दक्षिण अमेरिकेतील चिली या देशापर्यंत पसरते. त्यामुळे इंडोनेशियापासून चिलीपर्यंत नेहमीच भूकंपाचे तीव्र धक्के जाणवत आहेत.
हेही वाचा:
नाशिकच्या जागेवरून महायुतीत सावळा गोंधळ ; शिरसाटानंतर आता आणखी एका मंत्र्यांचा जागेवर दावा