नगर – शहरातील नवीन टिळक रोडवर असलेल्या स्मोकी व्हिल्ला हुक्का पार्लरवर कोतवाली पोलिसांनी छापा टाकून 17 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दीनेश दत्तात्रय खरपुडे (वय-28,रा. गोंधळे गल्ली, माळीवाडा यास ताब्यात घेतले आहे. पोलीस शहर उपाधिक्षक संदीप मिटके यांना नवीन टिळक रोडवरील कुंदा अपार्टमेंटच्या बेस मेंट मध्ये हुक्का पार्लर सुरु असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
त्यानुसार कोतवाली पोलिसांनी सोमवारी (दि.16) रोजी रात्री 10 वाजता छापा टाकून हुक्का पार्लरचा चालक-मालक दिनेश खरपुडेला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशीरापर्यंत कोतवाली पोलीस ठाण्यात सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम 2003 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ, सहायक पोलीस निरीक्षक रणदिवे, प्रमोद लहारे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात महाविद्यालयीन तरूण-तरूणींना आकर्षित करण्यासाठी न्यू टिळकरोडवर विनापरवाना स्मोकी व्हिल्ला हुक्का पार्लर सुरू असल्याने अनेक तरून वेसनाच्या आहारी जात आहे. शहरात कुठे सुरु असलेल्या हुक्का पार्लर चा पोलीसांनी शोध घेवून कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे. अशा अप्रवृत्तींना लगाम घालण्याची गरज आहे.