नाशिक – एका पोलिस कर्मचाऱ्याने आपल्या कुटुंबातील व्यक्तीवरच चाकू हल्ला केला त्यात त्यांच्या सासऱ्याचा मृत्यू झाला तर त्याची सासू आणि पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. सिन्नर तालुक्यातील दोडी दापुर गावात हा प्रकार घडला.
सूरज उगलमुगले असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून तो मनमाडला नियुक्तीला आहे. त्याला जुगाराचा नाद असून त्यातून तो कर्जबाजारी झाला होता. त्यामुळे तो सासरच्या लोकांकडून सातत्याने पैशाची मागणी करीत होता. त्याच्या पत्नीने या प्रकरणी स्थानिक पोलिसांत फिर्याद दिली होती, पण पोलिसांनी त्यावर काहीही कारवाई केली नाही.
दोन दिवसांपुर्वी त्याने सासरकडच्या लोकांवर आणि पत्नीवर चाकू हल्ला केला. त्यात सासरा मरण पावला. निवृत्ती दामोदर सांगळे असे त्यांचे नाव आहे. ते 58 वर्षांचे होते. या प्रकरणी पोलिसांनी सदर पोलिस कर्मचाऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.