नगर -सुंगधी तंबाखू पासून तयार केलेल्या मावा पुड्यामध्ये भरून त्या नगर शहरात दुचाकीवर विक्री करणाऱ्या एका युवकाला तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले. पाइपाइन रस्त्यावरील भिस्तबाग चौकात पोलिसांनी ही कारवाई केली.
याप्रकरणी अंबादास अनिल धनगर (वय- 19 रा. वैदुवाडी) याच्याविरूद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दुचाकी (क्र. एमएच- 16 बीए- 7494) व एक हजार रूपये किंमतीच्या मावा पुड्या असा 21 हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याबाबत पोलीस नाईक अमोल आव्हाड यांनी फिर्याद दिली आहे.
शहरामध्ये दुचाकीवरून मोठ्याप्रमाणात मावा विक्री केली जात आहे. दोन दिवसांपूर्वी तोफखाना पोलिसांनी दोन व्यक्तींना मावा विक्री करताना दुचाकीसह ताब्यात घेतले होते. सोमवारी पुन्हा तोफखाना पोलिसांनी भिस्तबाग चौकात कारवाई करून अंबादास धनगर याला ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक हारूण मुलाणी यांच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार मोरे करत आहे.