नारायणगाव -यूट्युब चॅनलवर बदनामी करण्याच्या उद्देशाने बातमीचा आशयाखाली चुकीची माहिती समाज माध्यमांमध्ये पसरवून खंडणी मागणाऱ्या संदीप उतरडे याला नारायणगाव पोलिसांनी जुन्नर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
संदीप पांडुरंग उतरडे व सचिन जाधव यांच्यावर 23 जुलैला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची फिर्याद सचिन ठाकूर यांनी नारायणगाव पोलिसांत दिली. आरोपींनी ठाकूर यांच्याकडे 1 लाखाची खंडणीची मागणी करून त्यातील 25 हजार रुपये ठाकूर यांच्याकडून जुन्नर येथे संदीप उतरडे व सचिन जाधव यांनी घेतले आहेत.