वारसॉ – रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या धुमश्चक्रीची दखल घेऊन पोलंडने देशाबाहेरील आपल्या उर्जाविषयक प्रकल्पांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. एकूण चार सुरक्षा विषयक श्रेणींपैकी दुसऱ्या क्रमांकाच्या सुरक्षा श्रेणीची सुरक्षा जारी करण्याच्या आदेशांवर पोलंडचे पंतप्रधान मातेयुस्झ मोराविकी यांनी आज स्वाक्षरी केली.
संभाव्य दहशतवादी हल्ल्यांपासून पोलंडच्या उर्जाविषयक प्रकल्पांचे रक्षण करण्याच्या हेतूने ही सुरक्षा वाढवण्यात येणार आहे.पोलंडने अलिकडेच नॉर्वेपासूनची एक गॅस पाईपलाईन सुरू केली आहे. ही पाईप लाईन बाल्टिक समुद्रातील काही भागातून जाते.
या गॅस पाईप लाईनमुळे पोलंडला रशियावर अवलंबून राहणे कमी होणार आहे. गेल्या आठवड्यात स्वीडनपर्यंत जाणाऱ्या रशियाच्या गॅस पाईप लाईनमधून गळती होऊ लागली होती. म्हणून पोलंडने ही खबरदारी घेतली आहे.
युक्रेनचा जो भूबाग रशियाने ताब्यात घेतला आहे, तेथील उर्जा प्रकल्पांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेने वरिष्ठ तज्5ांना युक्रेनला पाठवले आहे. युक्रेनच्या गॅस पाईप लाईनच्या सुर7ेसाठी अमेरिकेकडून 55 दशलक्ष डॉलरची मदत दिली जाणार आहे. अन्य सुरक्षाविषयक उपकरणेही उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यावर्षी फेब्रुवारीपासून अमेरिकेने युक्रेनला 9.89 अब्ज डॉलरची मदत उपलब्ध करून दिली आहे.