पुणे – (अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीयअध्यक्ष शशिकांत आप्प्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाख़ाली व अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेश अध्यक्ष रणजीत जागताप यांच्या हस्ते बुधवारी (५ ऑक्टोबर) शिवसेना उपशहर प्रमुख आणि मंडई विद्यापीठ कट्टाचे अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.
याप्रसंगी बाळासाहेब मालुसरे यांनी सांगितले की संघटना वाढवण्यासाठी दिवसरात्र एक करणार आहे. तसेच मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात जास्तीत जास्त न्याय मिळावा यासाठी काम करणार आहे.
यावेळी शशिकांत पवार- राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ, अर्चना शहा भिवरे अध्यक्ष बहुजन महाआघाडी महाराष्ट्र प्रदेश, रणजित दादा जगताप अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ, करणसिंह मोहितेहंबिरराव – युवक प्रदेश संघटक महाराष्ट्र, बाबासाहेब शिंदे- युवक अध्यक्ष पिंपरी चिंचवड, मयुरेश प्रताप पाटील- युवक अध्यक्ष पुणे शहर, समीर ऊर्फ प्रीतम इंदलकर, धनाजी शिंदे, स्वप्नील जाधव, हर्षद मालुसरे, गणी पटेल आदी उपस्थित होते.