डाका – बांगलादेशात “जमातुल अन्सार फिल हिंदाल शारकिया’ नावाची नवी दहशतवादी संघटना सक्रिय झाल्याचे उघड जाले आहे. अलिकडेच बांगलादेशातील रॅपीड ऍक्शन बटालियनने या संघटनेच्या 7 सदस्यांना अटक केली आहे. या संघटनेत सामील होण्यासाटी या सातही जणांनी आपले घर सोडले असल्याचे उघड झाले आहे.
जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेश, अन्सार अल इस्लाम आणि हरकत-उल-जिहाद-अल-इस्लामी बांगलादेश यासह बंदी घातलेल्या दहशतवादी गटांचे काही नेते आणि कार्यकर्ते मिळून हा नवीन गट स्थापन केला असल्याचे “रॅपीड ऍक्शन बटालियन’ च्या कायदेशीर आणि माद्यम विभागाचे संचालक कमांडर खंदकर अल मोईन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले
मुन्शीगंड, नारायणगंज,आणि म्यामेनसिंग या जिल्ह्यांमध्ये रॅपीड ऍक्शन बटालियनने मोहिम राबवून या 7 दहशतवाद्यांना अटक केली आहे. 2017 मध्ये काही इतर बंदी घातलेल्या दहशतवादी गटांचे कार्यकर्ते एकत्र आले आणि आपला गट विलीन करून त्यांनी नवीन गटाच्या हालचाली सुरू केल्या, असे अटक केलेल्या एका दहशतवाद्याने सांगितले.