– शिल्पा रसाळ
अहमदनगर – ‘काहीतरी वेगळा, चाकोरीबाहेरचा व्यवसाय करायचा असा माझा पहिल्यापासूनच मनोचंग होता. काय करता येईल, या विचार मंथनातूनच आपण सोन्याचा व्यवसाय करू या असे मनात आले आणि त्यादृष्टीने मी पावले उचलायला प्रारंभ केला. अभ्यासाअंती सोन्याचे दालन काढायचे ठरवले आणि 2006 मध्ये “पोखरणा ज्वेलर्स’ या सुवर्णपेढीचा जन्म झाला. पोखरणा ज्वेलर्सचे सर्वेसर्वा अनिल पोखरणा यांच्याशी गप्पा रंगल्या होत्या.
अनिलजी सुरवातीला नारळाच्या व्यवसायात होते. या व्यवसायात जम बसला होता. पण आता नव्या वाटा त्यांना खुणावू लागल्या. आपल्या मुलाला त्यांनी सुवर्ण व्यवसायाकरिता प्रशिक्षणासाठी पाठविले. मुलगा प्रशिक्षण घेऊन परतल्यावर अनिलजी या व्यवसायातील अनेक गोष्टी त्याच्याकडून शिकले. याचा त्यांना सार्थ अभिमान आहे.
नवीपेठेत 2006 मध्ये ‘पोखरणा ज्वेलर्स’ हे सुवर्ण दालन उभारून सराफी व्यवसायाला पोखरणा कुटुंबियांनी सुरुवात केली. पूर्वी या दालनांमध्ये भारतीय बैठक असायची. कालानुरुप नंतर काऊंटर आणि खुर्च्या आल्या.
आता मात्र भव्यदिव्य लकाकणारे, चकाकणारे शोरुम ही बाजारपेठेची आणि ग्राहकांचीही गरज व मागणी झाली आहे. सोन्याच्या भावात कितीही चढ-उतार झाले तरीही युवतींची, महिलांची सोन्याच्या दागिन्यांना असलेली मागणी कमी झालेली नाही.
आता पंधरा ते वीस टक्के पुरुषही सोन्याच्या दागिन्यांकडे आकर्षित झाले आहेत. परदेशातून आपल्याकडे प्युअर सोने येते. त्याचे दागिने तयार करताना आपण त्यात एक टक्का अलॉय (तांबे+चांदी व अन्य धातूचे मिश्रण) टाकतो. म्हणजे 100 टक्क्यांचे 92 टक्के होतात. याचाच अर्थ 22 कॅरेट सोने असे त्याला म्हणतात, हे अनिलजी समजावून सांगतात.
सुवर्ण महोत्सव – पोखरणा ज्वेलर्समध्ये दरवर्षी मंगळसूत्र, बँगल्स, चेन, कर्णफुले आदी महोत्सव आयोजित केले जातात. त्याला ग्राहकांची मागणी नेहमीच असते. या दागिन्यांचे वैविध्य या महोत्सवात पहायला मिळते. विस्तारित नगर शहरातील सुवर्ण ग्राहकांकरिता पोखरणा ज्वेलर्सचे अडीच वर्षांपूर्वी सर्जेपुरा भागात भव्य,
दिमाखदार दालन उभरण्यात आले. येत्या दि. 1 जुलै, 2023 पासून या दालनात डायमंड विभाग स्वतंत्रपणे सुरू करण्यात येणार आहे. नगरमध्ये डायमंडला मोठी मागणी आहे.
रोज गोल्ड – रोज गोल्ड हा नवा सुवर्ण प्रकार आता सराफ व्यवसायात आला आहे. रोज गोल्ड याचा अर्थ गुलाबी रंगाचे सोने. गुलाबी रंगाचे विशेष नाते तरुणाईशी आहे. गुलाबी रंग हा प्रेमाचा, प्रीतीचा. रोज गोल्डचे नाजूक व मोहक दागिने तरुणाईला आकर्षित करतात.
अनिलजी आपली सेवा अविरत देतात, सहकार्य करतात. लोकमानसात अनिल, अमित, आकाश पोखरणा आणि पोखरणा ज्वेलर्सने भरवसा आणि विश्वासार्हता जपत आणि टिकवत सुवर्ण व्यवसायात वेगळा ठसा निर्माण केला आहे.