पुणे – देशातील आघाडीच्या ज्वेलरी ब्रँडपैकी असलेल्या पीएनजी सन्स (पु. ना. गाडगीळ आणि सन्स)ने विमान नगर येथील फिनिक्स मार्केट सिटीमध्ये लोअर ग्राउंड फ्लोवरवर नवे शोरूम सुरू केले आहे. त्याचे उद्घाटन पीएनजी सन्सचे संचालक व प्रवर्तक अजित गाडगीळ, डॉ. रेणू गाडगीळ व कंपनीचे संचालक-सीईओ अमित मोडक यांच्या हस्ते शुक्रवारी झाली.
या वेळी सीएफओ आदित्य मोडक, प्रफुल्ल वाघ, समीर परांजपे, सतीश व श्रीकांत कुबेर आदी उपस्थित होते. नयन नाबरा व त्रिवेणी चाळके या शोरूमचे इनचार्ज आहेत.
फीनिक्स मार्केट सिटी मॉलमधील शोरूमबाबत अमित मोडक म्हणाले, की ग्राहकांच्या बदलणाऱ्या गरजा लक्षात घेऊन हे दालन डिझाइन केले आहे. ग्राहकांना नवीन प्रकारच्या खरेदीचा अनुभव मिळावा, अशा पद्धतीने शोरूमची रचना आहे. ग्राहकांना डिझायनर ज्वेलरीबरोबर मास्टर पीसेस आणि क्यूरेटेड कलेक्शनच्या व्हरायटीतून आवडीचा दागिना निवडता येईल. हिऱ्याच्या दागिन्यांची सर्वोत्तम व सर्वांत मोठी व्हरायटी येथे उपलब्ध आहे. त्याचबरोबर गार्गी बाय पीएनजी अँड सन्सची नॅचरल डायमंडची १४ कॅरेट गोल्डमधील व चांदीची प्रीमियम फॅशन ज्वेलरी पहिल्या दिवसापासून लाँच केली आहे. ब्रँडचे हे ३० वे शोरूम आहे.
फिनिक्समधील हे शोरूम सर्व दिवस सकाळी ११ ते रात्री ९ या वेळात सुरू असणार आहे. सुमारे तीन हजार चौरस फुटांचे हे शोरूम आहे. दसरा-दिवाळीचे औचित्य साधून पीएनजी सन्स (पु ना गाडगीळ आणि सन्स लि.) ने दागिन्यांच्या घडणावळीवर विशेष सवलत योजना जाहीर केली आहे. सोन्याच्या दागिन्याच्या घडणावळीवर ५० टक्क्यांपर्यंत, हिऱ्यांच्या दागिन्याच्या घडणावळीवर १०० टक्क्यांपर्यंत सवलत २० नोव्हेंबर २०२३ पर्यंत मिळणार आहे, असे आदित्य मोडक यांनी सांगितले.