नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासह काही विरोधी नेत्यांबरोबर चर्चा केली. देशभरातील करोनाच्या फेलावाच्या स्थितीबाबत मोदींनी यावेळी चर्चा केली असलयाचे समजते आहे.
याशिवाय समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव आणि अखिलेश यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक, द्रमुकचे नेते एमके स्टॅलिन आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाश सिंग बादल यांच्याशीही मोदींनी चर्चा केली. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांच्याबरोबर मोदींनी करोनाच्या साथीसंदर्भात चर्चा केली.
देशभरातील अन्य काही प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांबरोबरही मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बुधवारी चर्चा करणार असल्याचे समजते आहे.