Odisha Train Accident – ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी (2 जून) संध्याकाळी झालेल्या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी आतापर्यंतच्या बचाव कार्याची माहिती घेण्यासाठी बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर पीएम मोदी ओडिशातील अपघातस्थळी जातील आणि तेथील परिस्थितीचा आढावा घेतील आणि त्यानंतर ते रुग्णालयात जखमींची भेट घेतील.
Distressed by the train accident in Odisha. In this hour of grief, my thoughts are with the bereaved families. May the injured recover soon. Spoke to Railway Minister @AshwiniVaishnaw and took stock of the situation. Rescue ops are underway at the site of the mishap and all…
— Narendra Modi (@narendramodi) June 2, 2023
या घटनेत आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाला असून 900 हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. एनडीआरएफ, भारतीय लष्कर, भारतीय हवाई दल, राज्य आपत्ती निवारण दल, आर्मी मेडिकल कॉर्प्स अपघातस्थळी बचाव आणि मदत कार्य करत आहेत.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी शनिवारी (3 जून) सकाळी घटनास्थळी भेट दिली, तसेच रेल्वेमंत्र्यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय स्वतंत्र चौकशीचे आदेश दिले आहेत.
आज संध्याकाळपर्यंत बचावकार्य पूर्ण होईल
एनडीआरएफचे डीजी अतुल करवाल यांनी सांगितले की, ‘एनडीआरएफच्या 9 टीम अपघातस्थळी बचाव करत आहे. घटनेनंतर पाऊण तासात आमची पहिली टीम तिथे पोहोचली होती. 300 हून अधिक लोक बचाव कार्यात गुंतले आहेत आणि आम्ही आज संध्याकाळपर्यंत तेथे ऑपरेशन पूर्ण करू शकतो.’