नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी “दृष्टिहीनांसाठी अनुकूल’ असलेल्या नाण्यांची विशेष मालिका सुरू प्रकाशित केली. 1 रुपये, 2 रुपये, 5, 10 आणि 20 मूल्यांच्या नाण्यांवर आझादी का अमृतमहोत्सव डिझाइन असेल, ही नाणी केवळ स्मृती नाणी नाहीत तर ती चलनाचा भाग असतील.
नाण्यांची ही नवीन मालिका लोकांना अमृत कालच्या ध्येयाची आठवण करून देईल आणि लोकांना देशाच्या विकासासाठी काम करण्यास प्रेरित करेल,असे मोदींनी यावेळी नमूद केले. यावेळी मोदींच्या हस्ते ‘जन समर्थ पोर्टल’ लॉंच करण्यात आले. हे 12 सरकारी योजनांचे क्रेडिट-लिंक्ड पोर्टल आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन याही यावेळी उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या की, सरकारच्या प्रत्येक महत्वाच्या योजना पोर्टलवर प्रदर्शित केल्या जातील.नागरिकांना सरकारी कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक वेळी तेचतेच प्रश्न विचारावे लागणार नाहीत असे त्या म्हणाल्या. हे पोर्टल वापरण्यास अधिक सुलभ केले गेले आहे असेही त्यांनी नमूद केले.