हरियाणा – मूळची सांगलीची खेळाडू व राज्याची अव्वल महिला वेटलिफ्टर काजल सरगर हिने खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. याचबरोबर सुमित बंडाळे याने योगा प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.
वेटलिफ्टिंग, योगा (पारंपरिक) व सायकलिंग या क्रीडा प्रकारांतही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सुवर्णपदके पटकावली. कबड्डीत मुला-मुलींचे दोन्ही संघ विजयी झाले.
वेटलिफ्टिंगमध्ये सांगलीच्या काजल सरगरने महाराष्ट्राला 40 किलो वजन गटात हे यश मिळवले. या गटात तिने 113 किलो वजन उचलले. स्नॅच या प्रकारात 50 आणि क्लिन अँड जर्क प्रकारात 63 किलो वजन उचलले.
महाराष्ट्राच्या सुमित बंडाळे याला पारंपरिक योगासन प्रकारात सुवर्णपदक, आर्यन खरात व निबोध पाटील यांना अर्टिस्टिक पेअरमध्ये सुवर्णपदक तर वैदेही मयेकर व युगांका राजम यांना अर्टिस्टिक योगासन प्रकारामध्ये सुवर्णपदक मिळाले. अशी एकूण तीन सुवर्णपदके योगासन प्रकारात राज्याने मिळवली.