अहमदनगर – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आज (26 ऑक्टोबर 2023) अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी आणि अकोले या दोन ठिकाणी त्यांच्या हस्ते विविध कार्यक्रमांचा लोकार्पण सोहळा पार पडला.यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदींनी जेष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर (Baba Maharaj Satarkar) यांना श्रद्धांजली देखील अर्पण केली. (pm Modi in shirdi)
मोदी यांनी दौऱ्याची सुरुवात साईबाबांच्या (Shirdi Saibaba) समाधीचे दर्शन घेऊन केली. मोदी याआधी गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2008 साली आणि पंतप्रधान झाल्यावर 2018 साली शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला आले होते. त्यानंतर आज तिसऱ्यांदा ते साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाले. ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर (Baba Maharaj Satarkar) यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. नवी मुंबईतील नेरूळ येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.बाबा महाराज सातारकर यांनी आपलं आयुष्य अध्यात्माच्या प्रचार प्रसारासाठी अर्पण केलं. (Baba Maharaj Satarkar passed away)
बाबा महाराज यांच्याबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले,”आज सकाळी मला देशाचे अनमोल रत्न वारकरी संप्रदायाचे वैभव हभप बाबा महाराज सातारकर यांच्या वैकुंठ गमनाची दुःखद बातमी मिळाली. त्यांनी आपल्या कीर्तनातून जे समाज जागरणाचे कार्य केले ते येणाऱ्या पिढ्यांना चिरकाळ प्रेरणा देईल. त्यांची वाणी,त्यांची शैली लोकांचे मन मोहित करून घेणारी होती. त्यांच्या वाणीमधील ‘जय जय राम कृष्ण हरी’ या भजनाचा अद्भुत भाव आपण ऐकले आहेत. मी बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. (baba maharaj satarkar PM modi)
बाबा महाराज सातारकर यांचे निधन
ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले आहे. बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. बाबा माहाराज सातारकर यांचं पार्थिव आज दुपारी 3 :00 नंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखाना समोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ठेवण्यात येणार आहे.