Birthday Special : तापसी म्हणते प्लीज! नो कम्पॅरिझन  

आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे तापसी पन्नू. आज १ ऑगस्ट रोजी तापसीचा वाढदिवस आहे. आपण तिच्या विषयी काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.

 

View this post on Instagram

 

And sometimes like Monarch! 🦋 #Drama #Filmfare2020

A post shared by Taapsee Pannu (@taapsee) on

अभिनेत्री तापसी पन्नूने आता बॉलीवूडच्या चंदेरी दुनियेमध्ये आपला स्वतःचा एक ठसा उमटवला आहे. सोशल मीडियावरील स्पष्ट भूमिका आणि एक अनोखा अंदाज यांमुळे तापसीने इतरांपेक्षा वेगळी असल्याचे सिद्ध केले आहे.

तापसी म्हणते मी आयुष्यात बराच संघर्ष पाहिला आहे. त्यामुळेच मला चालून आलेला एकही चित्रपट सोडावासा वाटत नाही. सर्व धाटणीचे चित्रपट मला करायचे आहेत, असे ती सांगते. भलेही त्या चित्रपटात माझी भूमिका दहा मिनिटांची असो वा दोन तासांची मी माझ्या वाट्याला आलेले काम अत्यंत प्रामाणिकपणाने पार पाडते, असे तापसी सांगते.

 

View this post on Instagram

 

अमृ्ता (Amrita) हाँ मैंने अपने आँचल का अम्बर बनाया है। के कहीं गर मेरा रास्ता, चाहतों से अलग जो चले। के कहीं गर मेरे सीने में, साँस थोड़ी भी जो कम पड़े, मेरा अपना भी इक आसमाँ हो, ख़ुद को हर इक दिशा में बिखेरूँ, मुझ को हर इक दिशा से बुलाना, मैं अगर फिर से मिल भी जाऊँ मुझे पाश में भींच लेना मगर मेरे आसमाँ को तहा कर मुझे सौंप देना, ताकि तेरा भी इक आसमाँ हो और मेरा भी इक आसमाँ हो और मेरा भी इक आसमाँ हो। – अनुभव सिन्हा Now all yours…. #Thappad releases Today!

A post shared by Taapsee Pannu (@taapsee) on

विशेष म्हणजे लेडी अक्षयकुमार किंवा लेडी आयुष्मान खुराना यांसारख्या नावांनी तिला संबोधले जाते ही बाब तापसीला अत्यंत खुपते. ती म्हणते प्रत्येक व्यक्‍तीची स्वतःची अशी स्वतंत्र ओळख असते. त्यामुळे कोणाही दोन व्यक्‍तींमध्ये तुलना करणेच मला पटत नाही. तापसी म्हणते, लोकांनी पापी व्यक्‍तीपेक्षा पापाची घृणा केली पाहिजे.

Leave A Reply

Your email address will not be published.