नेपाळ – नेपाळमध्ये एक मोठा विमान अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळची राजधानी काठमांडूहून पोखराला जाणारे प्रवासी विमान कोसळले आहे. विमानात 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते.
#WATCH | A passenger aircraft crashed at Pokhara International Airport in Nepal today. 68 passengers and four crew members were onboard at the time of crash. Details awaited. pic.twitter.com/DBDbTtTxNc
— ANI (@ANI) January 15, 2023
विमान अपघातात आतापर्यंत 15 हून अधिक जणांच्या मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. हे विमान काठमांडूहून पोखराला जात होते. अपघातग्रस्त विमान यति एअरलाईन्सचे असल्याचे सांगितले जात आहे.
अपघाताची माहिती देताना एएनआयने सांगितले की, ‘नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर 72 आसनी प्रवासी विमान धावपट्टीवर कोसळले. सध्या बचावकार्य सुरू असून त्यासाठी विमानतळ बंद करण्यात आले आहे. एका स्थानिक अधिकाऱ्याने सांगितले की, अपघातामुळे विमानाला आग लागली. यादरम्यान बचावकर्ते ते विझवण्याचा प्रयत्न करत आहेत.
काठमांडू पोस्टने यति एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला यांच्या हवाल्याने सांगितले की, ‘एटीआर 72 यती एअरलाइन्सचे विमान जुने विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान क्रॅश झाले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या क्रॅशच्या चित्रे आणि व्हिडिओंमध्ये क्रॅश साइटवरून धूर निघताना दिसत आहे. विमान अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.’