मुंबई – शाहरुख खानचा बहुचर्चित पठाण हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटाच्या पहिल्या गाण्यानंतर जेवढा वाद झाला होता तो वाद ट्रेलर प्रदर्शित होता कमी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे आता प्रेक्षकांना पठाण चित्रपटाच्या रिलीजची प्रतीक्षा आहे.तत्पूर्वी चित्रपटाचे अनोख्या स्टाईलने प्रमोशन देखील सुरु असल्याचे पाहायला मिळते. दुबईच्या बुर्ज खलिफा इमारतीवर पठाणचा ट्रेलर झळकल्याचे आता समोर आले आहे.
या वेळेसचे बुर्ज खलिफाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताहेत. ज्यामध्ये बुर्ज खलिफा इमारतीवर ट्रेलर झळकत असताना शाहरुख खान देखील त्या ठिकाणी उपस्थित असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते.यावेळी बुर्ज खलिफा इमारतीच्या परिसरात मोठी गर्दी झाली होती. चाहत्यांनी पठाणचा ट्रेलर आणि शाहरुख खानला पाहण्यासाठी तुडुंब गर्दी केली होती.
View this post on Instagram
शाहरुख खानसोबत या चित्रपटामध्ये अभिनेता जॉन अब्राहाम आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील दिसणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली होती. प्रमोशनसाठी शाहरुखने आपल्या सोशल मीडियावर चाहत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देखील दिली होती. पठाण २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. पठाणसोबत बहुचर्चित ‘गांधी गोडसे एक युद्ध’ हा हिंदी चित्रपट तर अखंडा हा साऊथ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.