Pro Kabaddi 2023-24 : प्रो कबड्डी 2023-24 च्या 62 व्या सामन्यात, बेंगळुरू बुल्सने अतिशय रोमांचक सामन्यात पाटणा पायरेट्सचा 35-33 असा पराभव केला आणि 12 सामन्यांमध्ये त्यांचा पाचवा विजय नोंदवला. सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत पटना पायरेट्स संघ विजयाचा प्रबळ दावेदार होता, मात्र अखेरच्या क्षणी त्यांचा संघ ऑलआऊट झाल्याने सामन्याचा निकाल बदलला.
ಬೆಂಗಳೂರು ಬುಲ್ಸ್’ಗೆ ಭರ್ಜರಿ ಗೆಲವು🔥💪
ಪಾಟ್ನಾ ಪೈರೇಟ್ಸ್ ವಿರುದ್ಧ ಗೆದ್ದು ಬಿಗೀದ ಬೆಂಗಳೂರು⚔😍#ProKabaddiLeague #ProKabaddi #PKLSeason10 #HarSaansMeinKabaddi #BLRvPAT #BengaluruBulls #PatnaPirates pic.twitter.com/23bQlfKY3u
— ProKabaddi (@ProKabaddi) January 8, 2024
प्रो कबड्डी 2023-24 च्या या सामन्यात, बेंगळुरू बुल्स संघाचा बचाव चमकदार होता आणि बेंगळुरू बुल्सच्या दिग्गजांनी (सुरजित सिंग 8 टॅकल पॉइंट्स आणि रण सिंग 3 टॅकल पॉइंट्स) चमकदार कामगिरी करत संघाला गमावलेला सामना जिंकून दिला. पाटणा पायरेट्सचा कर्णधार नीरज कुमारनेही उच्चांकी 5 (5 Tackle ) गुण मिळवले पण त्याची जबरदस्त कामगिरी व्यर्थ गेली.
पूर्वार्धाच्या सुरुवातीला सामना बरोबरीत सुटला पण त्यानंतर पटना पायरेट्सने सामन्यावर वर्चस्व राखण्यास सुरुवात केली आणि 10 मिनिटांच्या ब्रेकच्या वेळी त्यांनी 9-5 अशी आघाडी घेतली. ब्रेकनंतर, पटना पायरेट्सने 15 व्या मिनिटाला बेंगळुरू बुल्सला ऑल आऊट केले आणि हाफ टाईमपर्यंत त्यांनी सामन्यात 20-12 अशी भक्कम आघाडी घेतली होती.
मात्र, पूर्वार्धात पाटणा पायरेट्सचा बचाव अधिक प्रभावी ठरला आणि कर्णधार नीरज कुमारने सर्वाधिक 3 टॅकल पॉइंट घेतले. त्याच्याशिवाय कृष्णा धुल आणि अंकितनेही प्रत्येकी 2-2 टॅकल पॉइंट घेतले. रेडिंग मध्ये पाटणाकडून मनजीतने पाटणा सर्वाधिक 4 रेड पाॅइंट घेतले. बंगळुरू बुल्सच्या बचावफळीनेही पहिल्या हाफमध्ये चांगली कामगिरी केली आणि सुरजीत सिंग आणि प्रतीक यांनी प्रत्येकी 3 टॅकल पॉइंट घेतले, परंतु बुल्सच्या रेडर्सनी निराशा केली.
दुसऱ्या हाफची सुरुवात थोडी संथ झाली पण पाटणा पायरेट्सने आपली आघाडी कायम ठेवली आणि 30 मिनिटांच्या ब्रेकमध्ये सामना 25-17 असा त्यांच्या बाजूने होता. सचिनच्या सुपर रेडमुळे पटनाची आघाडी आणखी मजबूत झाली, परंतु त्यानंतर बेंगळुरू बुल्सने सलग दोन सुपर टॅकल केले आणि सामन्याच्या शेवटच्या क्षणी सामना पूर्णपणे बदलला. शेवटच्या क्षणी पाटणा पायरेट्स ऑल आऊट झाला आणि बेंगळुरू बुल्सने हरलेला सामना 2 गुणांनी जिंकून सर्वांना आश्चर्यचकित केले.
#PKLSeason10 (#PUNvCHE Match 60) : पुणेरी पलटणची आगेकूच कायम; तमिळ थलैवाजवर विजय….
बेंगळुरू बुल्ससाठी सुरजित सिंगने बचावात 5 गुण मिळवले, तर सचिन नरवालने चांगली अष्टपैलू कामगिरी केली आणि एकूण 9 गुण (8 छापे आणि 1 टॅकल) मिळवले. पटनाकडून आज रेडिंग टाकण्यात कोणीही फारसे प्रभावी ठरले नाही आणि मनजीतने सर्वाधिक 7 रेड पाॅइंट घेतले. आजच्या सामन्याची सर्वात खास गोष्ट म्हणजे यात एकही सुपर 10 नव्हता.