Pro-Kabaddi League 2023-2024 (Mumbai) : – प्रो-कबड्डी लीगमध्ये रविवारी झालेल्या सामन्यांत पुणेरी पलटण संघाने तमिळ थलैवाज संघाचा २९-२६ असा अवघ्या ३ गुणांनी पराभव केला. या विजयाच्या जोरावर पुणेरी पलटण संघाने यंदाच्या स्पर्धेतील आगेकूच कायम राखली आहे. या सामन्यात पुणेरी संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो महंमदरेझा चियानेह. त्याने सर्वाधिक ८ गुण मिळवताना वर्चस्व राखले.
पुणेरी पलटन ने अपने अविश्वसनीय प्रदर्शन से जीता दिल 🧡
रोमांचक मुक़ाबले में तमिल थलाइवाज़ के ख़िलाफ़ 3️⃣ प्वाइंट्स से हासिल की जीत 💪💥
#ProKabaddiLeague #ProKabaddi #PKLSeason10 #HarSaansMeinKabaddi #PUNvCHE #PuneriPaltan #TamilThalaivas pic.twitter.com/vrX34M0iF4
— ProKabaddi (@ProKabaddi) January 7, 2024
या सामन्याला प्रारंभ झाला तेव्हा पुणेरी पलटण व तमिळ थलेवाज यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळाली. दोन्ही संघांनी अफलातून पकडी व चढाया केल्या. पहिले सत्र संपले तेव्हा पुणेरी पलटण संघ १२-११ असा अवघ्या एका गुणाने आघाडीवर होता. दुसरे सत्र सुरु झाल्यावरही पुणेरी संघाच्या खेळाडूंनी तमिळ संघाला फारशी संधी मिळू दिली नाही. परंतू पुणेरी संघाकडून अपेक्षीत आक्रमण काहीसे कमी झाले व त्याचा लाभ घेत तमिळ संघाने तुल्यबळ लढत दिली.
तमिळ संघाच्या सागर व नरेंद्रने अनुक्रमे ७ व ४ गुण मिळवले व मोक्याच्या क्षणी सामन्यात रंगत आणली. एकवेळ हा सामना बरोबरीत सुटणार असेच वाटत होते. मात्र, त्याचवेळी पुणेरी संघाच्या चियानेह याला सुरेख साथ देत कर्णधार अस्म इनामदार व गौरव खत्री यांनी महत्वपूर्ण रेड गुणांची कमाई केली. त्यांच्या याच कामगिरीच्या जोरावर पुणेरी संघाने हा सामना २९ विरुद्ध २६ असा अवघ्या ३ गुणांनी जिंकला.
Ultimate Kho Kho Season 2 : मुंबई खिलाडीजची पुन्हा राजस्थानवर मात….
पुणेरी संघाने रेडचे १२ तर टॅकलचे १३ गुण पटकावले. त्याचवेळी तमिळ संघाला ११ रेड तर १३ टॅकल गुण मिळवण्यात यश आले. मात्र, पुणेरी संघाने सर्वबादचे २ गुण मिळवले व सामन्याला कलाटणी दिली तर सर्वबादचा तमिळ संघ एकही गुण मिळवू शकला नाही.