पिंपरी -किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली. या घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना पिंपरीगाव येथे गुरुवारी (दि. 15) दुपारी घडली. प्रकाश व्यंकटराव धंदर (वय-50, रा. वाघेरे कॉलनी नं. 3, पिंपरीगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे.
याबाबत त्यांची मुलगी साक्षी प्रकाश धंदर (वय-19) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुरुवारी आरोपी प्रकाश याचे आपल्या पत्नीशी किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्यावेळी आरोपीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून गंभीर जखमी केले.