पिंपरी – माहेरहून 50 हजार रुपये आणले नाहीत म्हणून विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना मोशी येथे घडली. दीपक महादेव वाघमारे, सासरे महादेव वाघमारे, सासू उषा वाघमारे, नणंद दिक्षा भालेकर, दीर प्रदीप वाघमारे (सर्व रा. आळंदी रोड, मोशी गावठाण) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत 28 वर्षीय विवाहितेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.