पिंपरी – घरगुती कारणावरून पत्नीचा छळ करणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपरी येथे घडली. अशोक नागनाथ शिंदे (वय 38, रा. रेणुका हेरिटेज हौसिंग सोसायटी, खराळवाडी, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे. याबाबत 34 वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2008 ते 15 ऑगस्ट 2019 या कालावधीत आरोपी पती अशोक याने आपल्या पत्नीचा घरगुती कारणावरून छळ केला. तसेच दरवाजाच्या ग्रीलवर सत्तूर मारत मारण्याची धमकी दिली. सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख याबाबत अधिक तपास करीत आहेत.