कामगार मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करावा, बांधकाम कामगार सेनेची मागणी

वाकड – येथील कस्पटेवस्ती येथे बांधकाम साईटवर एका कामगाराचा डोक्‍यावर ट्रॉली पडून मृत्यू झाला होता. याप्रकरणी संबंधित बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बांधकाम कामगार सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत सेनेचे अध्यक्ष जयंत शिंदे यांनी कामगार उपायुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, डायनेस्ट्री सोसायटीजवळ छत्रपती चौक कस्पटेवस्ती वाकड येथे दिलेराम शोकुराम यादव (वय 34) यांच्या डोक्‍यावर ट्रॉली पडल्याने 29 मे 2019 रोजी मृत्यु झाला होता. डोक्‍यात ट्रॉली पडून व क्रेन कोसळून अपघात होण्याचे प्रमाण हे दिवसें-दिवस वाढत चालले आहे.

मागील वर्षी पुणे जिल्ह्यात अकोला या गावी नदी जोड प्रकल्पाच्या ठिकाणी 9 कामगारांचा मृत्यू झाला होता व हिंजवडीमध्ये एका कामगाराचा सुद्धा क्रेन कोसळून मृत्यू व 2 कामगार गंभीर जखमी झाले होते. अशा प्रकरणांमध्ये बिल्डरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यानंतर ठेकेदार, सुपरवायझर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. परंतु, बऱ्याच साईटवर मुळ मालकांवर गुन्हा दाखल केल्यास अशा घटनांना आळा बसेल, असे बांधकाम कामगार सेनेने म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.