महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावले

तळेगाव दाभाडे – भाजी खरेदी करून घरी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील चार तोळ्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून येणाऱ्या चोरट्यांनी गळ्यातून हिसकून घेऊन पोबारा केला. येथील यशवंतनगर, तळेगाव दाभाडे येथे रविवारी (दि. 2) सायंकाळी सात वाजता घडली. या प्रकरणी सोनाली संभाजी मराठे (वय 33, रा. तपोधाम कॉलनी, सरस्वती शाळेजवळ, तळेगाव स्टेशन) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार रविवारी सायंकाळी सातच्या सुमाराला बाजारातून भाजी खरेदी करून मराठे आपल्या घराकडे जात असताना सरस्वती विद्या मंदिर शाळेमागे अज्ञात चोरट्यांनी एकट्या महिलेला पाहून त्यांच्या गळ्यातील चार तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकाले. त्यानंतर दुचाकीवरून पोबारा केला.

सध्या चोरीच्या घटना तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडत आहेत. यामध्ये गावभागात भरदुपारी महिलेचे हात-पाय बांधून तिच्या घरातील चोरी झाली. याप्रकरणी तळेगाव पोलीस तपास करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.