अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू

पिंपरी  – भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला जोराची धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. ही घटना मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर दि. 21 मे रोजी पहाटे पावने तीन वाजण्याच्या सुमारास घडली.

आकाश सोमनाथ गायकवाड (वय-21 रा. निगडी) असे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार के.के गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश मोटारसायकल (क्र. एमएच 14/ एफडब्ल्यू 8676) वरुन मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरुन जात असताना अज्ञात वाहनचालकाने दिलेल्या धडकेमुळे आकाश यांचा मृत्यू झाला. त्याच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. यात आकाश हा गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.