सोशल मीडियावर तरुणीची बदनामी

पिंपरी – फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम व यू ट्यूब अशा समाज माध्यमातून तरुणी, तिची आई व इतरांबाबत अश्‍लील मजकूर प्रसारित करुन बदनामी केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. तरुणीच्या नावाने बनावट अकाउंट उघडून बदनामी करणाऱ्या भोपाळच्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी 25 वर्षांच्या एका तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, सौरभ सुरेश कान्होरे (रा. भोपाळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या नावे आरोपी सौरभ कान्होरे याने फेसबूक, ट्विटर इन्स्टाग्राम व यू ट्युबर बनावट अकाऊंट काढून उघडले आहे. या बनावट अकाउंटवरुन फिर्यादी, तिची आई व इतर व्यक्‍तींबाबत अश्‍लील मजकूर प्रसारित करुन फिर्यादी महिलेची बदनामी केली. या प्रकरणात आरोपी सौरभ याचा पोलीस शोध घेत असून त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×