अश्‍लिल फोटो काढून तरुणीची बदनामी

पिंपरी – नात्यातील तरुणीचे अश्‍लिल फोटो काढून व्हायरल करून तरुणीची बदनामी केली. तसेच लग्न ठरले असताना तिच्या सासरच्या लोकांना फोटो दाखवून लग्न जाणिवपूर्वक मोडल्याची घटना म्हाळुंगे परिसरात घडली.

या प्रकरणी 26 वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार दिनेश शिवाजी पारखी (रा. माण, ता. मुळशी) याच्यावर चाकण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत तरुणी व आरोपी नातेवाईक असल्याने एकमेकांच्या ओळखीचे होते.

30 जुलै 2018 रोजी दिनेश याने पिडीत तरुणीला घेऊन म्हाळुंगे येथे लॉजवर नेऊन अश्‍लिल फोटो काढले. यानंतर आरोपीने हे फोटो मित्रांना पाठवून पिडीत तरुणीची बदनामी केली. तसेच तिचे ज्या कुटूंबात लग्न जमले होते, त्यांना फोटो दाखवून लग्न मोडले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास चाकण पोलीस करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.