सोशल मीडियाच्या माध्यमातून चिमुरडीचा शोध घेण्यात यश

पिंपरी – समाजात सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक गैरप्रकार घडत आहेत. मात्र, समाज माध्यमाचा वापर योग्य पध्दतीने केल्यास चांगल्या गोष्टींही घडू शकतात. याचा प्रत्यय बुधवारी भोसरी पोलिसांना आला. दहा वर्षांची हरवलेली चिमुरडी सोशल मीडियाच्या माध्यमातून भोसरी पोलिसांनी अवघ्या काही तासांत शोधून काढली.

बुधवारी (दि. 5) दुपारी कार्तिकी खोडके नावाची नऊ वर्षांची मुलगी घराजवळच्या मंदिरात जाऊन येते म्हणून घराबाहेर पडली. मंदिर घराजवळ असल्याने घरच्यांनी तिला एकटीला जाण्यासाठी परवानगी दिली. परंतू, मुलगी मंदिरात गेल्यानंतर घरी येताना रस्ता चुकली. बराच वेळ झाला तरी मुलगी घरी न परतल्याने घरच्यांनी परिसरात शोध घेतला. परंतू, मुलगी सापडत नसल्याने कार्तिकीचे कुटुंबिय घाबरले. त्यांनी तात्काळ भोसरी पोलिसांत धाव घेतली आणि कार्तिकी हरवल्याची माहिती दिली.

भोसरी पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एकूण 17 जणांचे पथक तयार केले. परिसरात शोधाशोध सुरु केली. दरम्यान, पोलिसांनी कार्तिकीचा फोटो आणि संपर्क क्रमांक व्हाट्‌सअप ग्रुपवर शेअर करुन कार्तिकीला शोधण्याचे आवाहन केले. वीस तास उलटूनही कार्तिकीचा काहीच पत्ता लागत नसल्याने कुटुंबिय घाबरलेल्या अवस्थेत होते.

मात्र, पोलिसांनी धीर दिला. रात्री साडे नऊच्या सुमारास दिघी रोडवरून जाणाऱ्या एका गृहस्थाने सोशल मीडियावर कार्तिकीचा फोटो बघितला होता. पोलिसांनी दिलेल्या वर्णनाची मुलगी दिघी रोडवर असलेल्या मंगलमूर्ती कार्यालयाच्या दारात बसली असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पालकांसह पोलिसांनी दिघी रोडवर धाव घेत घेतली. यावेळी एक मुलगी कार्यालयासमोर बसलेली दिसली. खात्री केल्यानंतर ती कार्तिकीच असल्याचे लक्षात आले. यानंतर पोलिसांनी तिला तिच्या पालकांकडे सुखरूप सुपूर्द केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.