भांडणे मिटविणाऱ्या भावांना मारहाण

पिंपरी – चौघाची आपसात सुरु असलेली भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या दोघा भावांना लोखंडी टॉमी आणि सिमेंटच्या गट्टूने जबर मारहाण करण्यात आली. या घटनेत एका भावाचा हात मोडला आहे. ही घटना रविवारी (दि.2) रात्री आठच्या सुमारास तळवडे-रुपीनगर रोड येथील सार्थक मोटर्स समोर घडली.

याप्रकरणी सतीश पोपट मंडलिक (वय 30, रा. शिवशंभो हौसिंग सोसायटी, रुपीनगर तळवडे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अजय गालफाडे, तौफीक शेख (दोघे रा. ओटास्किम, निगडी), गोट्या आणि एका अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री आठच्या सुमारास तळवडे-रुपीनगर रोड येथील सार्थक मोटर्सच्या समोर चौघा आरोपींचा आपसात वाद सुरु होता. हे पाहून फिर्यादी सतीश यांच्या भावाने मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी सतीश आणि त्यांच्या भावाला सिमेंटचा गट्टू तसेच लोखंडी टॉमीने मारहाण केली. यामध्ये सतीश यांचा हात मोडला असून घटनेनंतर आरोपी पसार झाले आहेत. चिखली पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.