पिंपरी – तांत्रिक कारणांसाठी रविवारी (दि. 10) सकाळी सहाऐवजी ते सात वाजल्यापासून मेट्रो सुरू होणार असून हा बदल केवळ एक दिवसासाठी असल्याचे मेट्रोकडून सांगण्यात आले. लाइन 1 पीसीएमसी ते सिव्हील कोर्ट मेट्रो स्थानक व लाइन 2 वनाझ ते रुबी हॉल मेट्रो स्थानक या दोन्ही मार्गांवरील मेट्रो सेवा एक तास विलंबाने सुरू होणार आहे.
काही ट्रायल घेण्यात येणार असल्याने हा बदल करण्यात आला आहे. सकाळी सहा वाजता धावणारी मेट्रो सकाळी सात वाजता धावेल. पिंपरी चिंचवड महापालिका स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक मार्गावरील मेट्रो ही सकाळी 7 ते 8 दर दरम्यान 15 मिनिटांनी, सकाळी 8 ते 11 दर 10 मिनिटांनी, सकाळी 11 ते दुपारी 4 दर 15 मिनिटांनी, दुपारी 4 ते रात्री 8 दर 10 मिनिटांनी आणि रात्री 8 ते 10 दर 15 मिनिटांनी मेट्रो धावेल. तांत्रिक कारणामुळे दोन्ही मार्गिकांवरील प्रवासी सेवा सकाळी सहा वाजता ऐवजी सात वाजल्यापासून सुरू होणार आहे, अशी माहिती पुणे मेट्रोकडून देण्यात आली आहे.
मेट्रोने आपली प्रवासी सेवा प्रवाशांच्या सोयीसाठी सकाळी एक तास लवकर सुरू केली होती. मात्र, रविवारी (दि. 10) काही ट्रायल घेण्यात येणार आहेत. त्यासाठी हा बदल करण्यात आल्याचे मेट्रोकडून सांगण्यात आले.