ऋतू कोणताही असो, आपण कोठेही असू, आपण आपल्या आहारातून तसेच आपल्या सौंदर्य प्रसाधनाचा वापर करत आपल्या शरीराची, त्वचेची, केसांची, डोळ्यांची काळजी घेतली पाहिजे. थंडीच्या दिवसात रोज अंघोळीच्या पाण्यात ग्लिसरीनमिश्रित पाणी वापरले तर यातील अल्फा हैड्रॉक्सी ऍसिड आपली शारीरिक तसेच चेहऱ्याची त्वचा मऊ, मुलायम व मॉइश्चरायझर युक्त ठेवण्यास मदत करते. रोज दैनंदिन जीवनात क्लिन्सिंग, टोनिंग, नरिशिंग ही पद्धत आपण सर्वांनी अवलंबली पाहिजे. आपल्या स्वयंपाकघरातील उत्तम क्लिन्सर मध, तसेच लिंबू यासोबत थोडा हिरव्या सफरचंदाचा रस आपल्या त्वचेला स्वच्छ तसेच यातील अल्फा हैड्रॉक्सी ऍसिड घटक पुरवतात.
त्वचेतील हानिकारक ऑक्सिडायझिंग एजंट्स काढून टाकण्यास मदत करतात. बाजारात हिरवी सफरचंद मुबलक मिळतात. यातील व्हिटॅमिनसी, व्हिटॅमिन ए, बी आपल्या त्वचेला उजाळा देतात. तसेच वयात येणाऱ्या मुलामुलींनी खाण्यात तसेच याचा ज्यूस पाण्यात मिसळून फेस वॉश म्हणून वापरला तर मुरूम, ऍकने तसेच त्वचाविकार कमी करण्यास मदत करते. हिरव्या सफरचंद साली वाळवून पावडर करून व दूध मिसळून चेहऱ्याला लावल्यास हे उत्तम अँटी एजिंग म्हणून ड्राय त्वचेला मदतनीस ठरते. तसेच हीच पावडर + मध + लिंबू रस याचे मिश्रण ऑइली डार्क त्वचेला खूप मदतनीस ठरते.
शरीरातील हार्मोनल इंम्बॅलन्स, लो ब्लडप्रेशर, ओव्हर मेडिकेशन, चुकीचे सौंदर्यप्रसाधन वापर, अती मेलॅनिन सिक्रिशन, तसेच जास्तवेळ ऊन्हात राहिल्यामुळे पिग्मेंटेशन होते. पिग्मेंटेशनचे विविध प्रकार आहेत. हायपर पिग्मेंटेशन, हायपो पिग्मेंटशन, बटरफ्लाय मार्क्स, स्पॉट पिग्मेंटेशन, क्लोयेस्मा, फ्राकल्स. बऱ्याचवेळा चेहऱ्यावर येणाऱ्या प्रत्येक डागाला वांग अथवा पिग्मेंटेशन समजले जाते.यासंबंधी तज्ञांचं सल्ला घेणे आवश्यक असते. आपल्या शरीररचनेमधे त्वचा हा सर्वात मोठा अवयव आहे. त्वचा अनेक थरांची असून मुबलक पेशींपासून बनलेली आहे.
स्पॉट पिग्मेंटेशन, क्लोयेझमा, फ्राकेलस यासारख्या वांगवर कांदा, ऍपल सिदार वेनेगर यासारखे घरगुती उपाय उत्कृष्टरित्या उपयोगी होतात. या वांगवर ओला जांभळा कांद्याचा ज्यूस घेऊन कापसाने लावावा अथवा गोल कापसाच्या पॅडवर हा ज्यूस घेऊन 5 ते 10 मिनिटे ठेवावा. पोस्ट ऍकने डाग हे पण एक प्रकारचे वांग असतात. त्यावर जर कोरफडीचा गर + मध + 2 थेंब ऍपेल वेणेगर असा मास्क पण आपण घरच्या घरी वापरला तरी तो उपयुक्त ठरतो. हायपर पिग्मेंटेशन, बटरफ्लाय मार्क्ससाठी घरच्या घरी बटाटा व टोमॅटो हे गुणकारी ठरतात. टोमॅटोमध्ये लायकोपेनी नावाचे अँटीऑक्सिडंट व व्हिटॅमिन ए असते. जे या प्रकारच्या पिग्मेन्ट कमी करण्यास मदत करते.
मेलॅझमा, सन बर्न हे सारे पिग्मेंटेशनचे प्रकार आहेत. 2 चमचे टोमॅटो रस + 1 चमचा लिंबू रस असे मिश्रण यावर 15 मिनिटे लावावे. नंतर परत हे मिश्रण कापसावर घेऊन 3 मिनिटे गोलाकार मसाज करावा व कोमट पाण्याने पुसून घ्यावे. गहू वर्ण ते गोऱ्या त्वचेला वांग येण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी खाण्यामध्ये शेंगदाणा तेल वापरू नये. तसेच या त्वचेची काळजी घेताना आठवड्यातून 2 वेळा बटाटा रस अथवा बटाट्याचे काप त्वचेवर 5 ते 10 मिनिटे लावावे. रोझेशिया हा एक कॉमन स्किन प्रॉब्लेम वयात येणाऱ्या काही मुलामुलींना असतो. यावर ओटमील मास्क गुणकारी ठरतो. ओटमिल पावडर + 2 ड्रॉप कमोमोईल ऑईल + 2 ड्रॉप मध असा मास्क तयार करून लावल्यास ते उपयुक्त ठरते. केमिकल ट्रीटेड केसाची कायम जास्त काळजी घ्यावी लागते, केमिकल थेरपी त्यातील हानिकारक ऍसिड मुले केस व स्कॅलप डॅमेज करतात. अशा वेळी केसांना नरिशमेंटसाठी हेअर मास्क कंडिशनर वापरावेत.
शिया बटर + ऑलिव्ह ऑईल थोडेसे मेल्ट करून घेऊन त्यात मध व इसेंशियल ऑईल घालून चांगले मिक्स करून केसांवर लावावे. 15 मिनिटे ठेवून कोमट पाण्याने वॉश करावे.केसातील कोंडा तसेच फंगल इन्फेक्शन, राठ केसांसाठी स्वयंपाक घरातील बेकिंग सोड्याचा अँन्टिफंगल प्रॉपर्टी उपयुक्त ठरतात. कोणत्याही हेअर कन्डिशनरमध्ये बेकिंग सोडा मिक्स करून घेऊन ते मिश्रण स्काल्प व केसांवर लावून घेऊन शॉवर कॅप घालावी. 20 मिनिटे ठेवून कोमट पाण्याने शाम्पू वॉश करून पुन्हा कन्डिशनेर कराव. डोळ्यांच्या भोवताली डार्क सर्कल हा हार्मोनल इम्बॅलन्स बॅलन्समुळे येणारा त्वचाविकार आहे. खाण्यातील व्हिटॅमिनचे संतुलन योग्य राखल्यास तसेच आहारात व्हिटॅमिन ए व सी घेतले पाहिजे.
दिवसातून दोन वेळा तरी थंड पाण्याने आय वॉश घेतला पाहिजे. डोळ्याखाली खूप काळेपणा असेल तर बटाट्याचे काप निरश्या दुधात ठेवून ते फ्रीजमध्ये ठेवावेत. हे काप दिवसांतून दोन वेळा 10 मिनिट डोळ्यांवर ठेवावे. काळेपणा कमी करण्यास तसेच डोळ्याचा दाह कमी करण्यास मदत करते. डोळ्याच्या उत्तम आरोग्यासाठी रोज हाताच्या बोटांनी गोलाकार मसाज 5 ते 6 मिनिटे देणे गरजेचे आहे. ज्यामुळे डोळ्याभोवतालच्या त्वचेचे रक्ताभिसरण वाढते. तसेच डोळ्यांखालील वर्तुळे येण्यास प्रतिबंध होतो.