रावेत-वाल्हेकरवाडी परिसरात अवैध धंदे

स्थानिक नगरसेवक ओव्हाळ यांची पोलिसांत तक्रार

देहुरोड – रावेत आणि वाल्हेकरवाडी परिसरात काही हॉटेल व्यावसायिक अवैध धंदे करीत आहेत. या भागात अवैध दारू, मटका, जुगार, हुक्काबारसह वेश्‍या व्यवसाय सुरू केला आहे. या अवैध धंद्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे, अशी तक्रार नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी पोलिसांकडे केली आहे. संबंधित व्यावसायिकांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक ओव्हाळ यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

ओव्हाळ यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनानुसार, देहुरोड पोलीस ठाणे व चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत समावेश असणाऱ्या रावेत, वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा भागात अनेक हॉटेल व्यावसायिक असून, काही व्यावसायिकांकडून अनधिकृत हॉटेल व्यवसायासह अवैध दारू विक्री, हुक्‍काबार चालविण्यात येत आहे. परिसरात काही ठिकाणी मटका, जुगार, मटका सुरू आहेत. तसेच या भागात खुलेआम वेश्‍या व्यवसाय सुरू आहे. या व्यवसायांमुळे परिसरातील महिला व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ज्येष्ठ नागरिकही त्रस्त झाले आहेत.

तसेच रात्री उशिरापर्यंत हे व्यवसाय राजरोसपणे सुरू ठेवण्यात येत आहे. त्यामुळे तरुण मुले-मुली वाम मार्गाला लागून गुन्हेगारी वाढत आहे. अशा अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई करावी. या अवैध व्यवसायांवर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.