भांडण सोडवणाऱ्या तरुणावरच वार

पिंपरी – मित्राचे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले. ही घटना रविवारी (दि.19) रोजी रात्री अकराच्या सुमारास थेरगाव येथील जय भवानीनगर येथील अमृता फ्रेश मार्केटसमोर घडली. पंकजधनु सिंग असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

या प्रकरणी रुपेश विजय सुर्यवंशी (वय 18, रा. थेरगाव) याने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मोन्या उर्फ प्रशांत सतीश सोनवणे, अविनाश मुरकुटे, कृष्णा गडहिरे, अशपाक शेख आणि इतर दोन अनोळखी इसमांविरोधात (सर्व रा. विद्यानगर, आकुर्डी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री फिर्यादी रुपेश आणि आरोपींमध्ये किरकोळ कारणावरुन बाचाबाची झाली होती. यानंतर त्यांच्यामध्ये भांडण सुरु झाले. भांडण सुरु असताना रुपेश याचा मित्र पंकजधंनु सिंग याने मध्यस्थी करीत भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपी अविनाश मुरकुटे याने पंकजधनु याच्या हातावर कोयत्याने वार करुन जखमी केले. या प्रकरणाचा अधिक तपास सहय्यक पोलीस निरीक्षक भोगम करीत आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.