- 10 रुग्णांचा मृत्यू – 502 रुग्णांना डिस्चार्ज
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात आज 1259 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. आजपर्यंत शहरात 58747 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर बुधवारी 10 रुग्णांचा मृत्यू झाला.
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार , बुधवारी चार वाजेपर्यंत शहरात 1259 रुग्णांची नोंद झाली. शहरातील 1240 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील 10 रुग्णांना करोनाची लागण झाली. तसेच 10 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 7 व शहराबाहेरील 3 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरात 58747 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. शहरातील महापालिकेचे रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सद्यस्थितीत शहरात 6982 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 901 रुग्णांचाही समावेश आहे.
बुधवारी दिवसभरात शहरातील चिखली, काळेवाडी, भोसरी, चिंचवड, थेरगाव, वाल्हेकरवाडी येथील 7 रुग्णांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील खेड, भवानीपेठ येथील तीन रुग्णांचा मृत्यू झाला.
आज दिवसभरात 502 रुग्णांना घऱी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 48094 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 4718 संशयित रुग्णांना महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांतील 3311 जणांचे तपासणी अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.