पिंपरी (प्रतिनिधी) :- सेन्टोसा रिसोर्टच्या वॉटर पार्कमध्ये बुडून सहा वर्षीय मुलीचा वॉटर पार्कमध्ये बुडून मृत्यू झाला. ही घटना 12 जून रोजी सेन्टोसा रिसॉर्ट येथे घडली. याप्रकरणी रिसोर्ट मालक, मॅनेजर व सुपरवायझरच्या विरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाहिरा याकुबअली मुल्ला (वय 6, रा. सोनिगरा विहार सोसायटी, काळेवाडी) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. मॅनेजर राहुल आबा मोरे (रा. रावेत), सुपरवायझर सागर भगवान काळे (रा. शेळकेवस्ती) आणि सेन्टोसा रिसॉर्टचा मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस हवालदार राकेश शांताराम पालांडे यांनी 13 जून रोजी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत शाहिरा या आपली आई आणि दोन भावांसह पिकनिकसाठी सेन्टोसा रिसॉर्ट येथे आल्या होत्या. आई खाऊ आणण्यासाठी चालली असता तिला शाहिरा दिसली नाही. तिने शाहिराच्या दोन भावांना विचाले असता त्यांनी देखील शाहिराला पाहिले नसल्याचे सांगितले.
भरमसाठ शुल्क, परंतु सुविधा नाही…
रिसोर्टमध्ये भरमसाठ शुल्क आकारले जाते परंतु लहान मुलांच्या जीविताची काळजी घेतली जात नसल्याचे या घटनेने स्पष्ट झाले आहे. रिसोर्टच्या वतीने लाइफ जॅकेट देण्यात आले नाही. लहान मुलांबाबत मार्गदर्शक सूचनालाही लावलेल्या नव्हत्या. लहान मुले पाण्याजवळ आणि पाण्यात खेळत असताना जीवरक्षकांचे लक्ष असणे गजेचे होते. त्यामुळे अपघातास सेन्टोसा रिसॉर्टचा मालक, मॅनेजर व सुपरवायझर जबाबदार असल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.