शिक्रापूर -पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील शंकर मंदिर परिसर व इतर ठिकाणी चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे इतर ठिकाणच्या चोऱ्या फसल्या असून येथील एका महिलेचे दोन तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत.
सीताबाई रामदास बोत्रे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांना जागृत राहण्याचे आवाहन केले.