पुणे – 19 वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा दिनांक 2 ते 9 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. महोत्सवात यंदा महोत्सवात 150 हून अधिक चित्रपटांची मेजवानी चित्रपट रसिकांना मिळणार आहे.
दरम्यान, या महोत्सवाची ऑनलाईन नोंदणी दि. 18 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. अशी माहिती महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी चित्रपट समीक्षक समर नखाते, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे प्रमुख प्रकाश मगदूम हे उपस्थित होते.