Physics Nobel Prize – इलेक्ट्रॉनच्या हालचालींचा कालावधी मोजण्याबाबतच्या संशोधनासाठी 3 संशोधकांना यंदाचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार (Physics Nobel Prize) जाहीर झाला आहे. अमेरिकेतील ओहियो स्टेट विद्यापिठातील पीअर ऍगोस्टिनी, (Pierre Agostini)
जर्मनीतील म्युनिक विद्यापिठातील मॅक्स प्लॅंक इन्स्टिट्युट ऑफ क्वांटम ऑप्टिक्स आणि ल्युडविन मॅक्समिलनमधील फेरेक क्रॉस्झ (Ferenc Krausz) आणि स्वीडनमधील लुंड विद्यापिठातील ऍन हुलियर (Anne L’Huillier) यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
या तिघांच्या संशोधनातून जगाला अणूच्या आतील इलेक्ट्रॉन आणि रेणूंच्या रचनेला जाणून घेण्याची पद्धती समजू शकली आहे, असे रॉयल स्विडीश ऍकेडमी ऑफ सायन्सेसने या पुरस्काराची घोषणा करताना म्हटले आहे.
BREAKING NEWS
The Royal Swedish Academy of Sciences has decided to award the 2023 #NobelPrize in Physics to Pierre Agostini, Ferenc Krausz and Anne L’Huillier “for experimental methods that generate attosecond pulses of light for the study of electron dynamics in matter.” pic.twitter.com/6sPjl1FFzv— The Nobel Prize (@NobelPrize) October 3, 2023
त्यांनी प्रकाशाच्या अत्यंत लहान किरणाचा वापर वेगवान रेणू आणि मॉलेक्युरची प्रक्रिया मोजण्यासाठी केला जाऊ शकतो हे दाखवून दिले आहे. इलेक्ट्रॉनच्या हालचाली आणि उर्जा रुपांतरणाच्या प्रक्रियेचा वेग यामुळे मोजणे शक्य झाले आहे.
विभक्त झाल्यानंतरही लहान कण एकमेकांशी संबंध टिकवून ठेवू शकतात. हे सिद्ध करण्यासाठी तीन शास्त्रज्ञांनी एकत्रितपणे केलेल्या संशोधनासाठी गेल्या वर्षी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जिंकला होता.
त्या सिद्धांतावर शंका उपस्थित केली गेली होती. मात्र आता माहितीच्या रुपांतरणासारख्या वास्तव विश्वातत उपयोग केला जाऊ लागला आहे. उद्या रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार आणि गुरुवारी साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा केली जाणार आहे.
शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा शुक्रवारी होणार असून अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा 9 ऑक्टोबरला केली जाणार आहे. दिनांक 10 डिसेंबरला स्टॉकहोम येथे होणाऱ्या समारंभात इतर पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. तर शांततेचा नोबेल पुरस्कार ओस्लो येथे होणाऱ्या समारंभात दिला जाणार आहे.