पुणे : पुणे मेट्रोसह पुण्यातील विविध उपक्रमांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावरली त्यांनी पुणे महानगरपालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. तसेच पुण्यातील पहिल्या मेट्रोचे उदघाटन केले. दरम्यान, पंतप्रधानांची आता एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर प्रचारसभा सुरु आहे.
यावेळी पंतप्रधानांच्या अगोदर मान्यवरांचे भाषण सुरु झाले .यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शेजारी शेजारी बसले होते, दोघांमध्ये बराच वेळ गप्पा झाल्या . दरम्यानचा फोटो आणि व्हिडिओ सोशलवर चांगलाच व्हायरल होत असून नेटकऱ्यांनकडून ‘पुन्हा शपथविधी’ असं म्हणत या फोटोवर कॉमेंट्स देण्यात आली आहे.