पुणे : पुणे मेट्रोसह पुण्यातील विविध उपक्रमांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मोदींच्या हस्ते महत्त्वाकांक्षी अशा पुणे मेट्रोच्या गरवारे महाविद्यालयाजवळी मार्गिकेचे उद्घाटन केले . मोदींची आज एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर प्रचारसभा झाली. यावेळी पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. तसेच त्यांनी काँग्रेसला यावेळी टोला देखील लगावला.
“आधी भूमिपुजन व्हायचे, पण माहीत नसायचं की उद्घाटन कधी होणार म्हणून आजचं उद्घाटनं जास्त महत्त्वाचं आहे, असे म्हणत मोदींनी काँग्रेसला टोला लगावला. एवढेच नाही तर वेळेत प्रकल्प पूर्ण केलेल जाऊ शकतात हे आज सिद्ध झाल्याचे मोदींनी बोलताना सांगितले. मुळा-मुठा नदीला प्रदूषणापासून मुक्त करण्यासाठी ११०० करोड रुपयांचं प्रकल्प सुरु होतोय. पुण्याला ई-बस मिळाल्या आहेत. आज पुण्यात अनेक विविधतापूर्ण आयुष्यात एक सुंदर भेट आर. के. लक्ष्मण यांना समर्पित करण्यात आलं आहे. एक उत्तम कलादालन पुण्याला मिळालाय.
भाषणाच्या सुरुवातीला मोदींनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे यांच्यासह अशा अनेक प्रतिभाशाली साहित्यिक, कलाकार, समाजसेवकांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पुण्यनगरीतील माझ्या बंधु-भगिनींना नमस्कार! असे म्हणत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील मेट्रोच्या कामाचे कौतुक करताना काँग्रेसला चिमटा काढला.