बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफची मुलगी आणि टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफने चित्रपटसृष्टीत पाऊल न ठेवण्याचा निर्णय घेतला असेल. पण तिची लोकप्रियता एखाद्या स्टार कलाकारापेक्षा कमी नाही. कृष्णा श्रॉफ आपल्या लूक आणि स्टाइलमुळे सतत प्रसिद्धीच्या झोतात असते. कृष्णाने नुकतेच एक फोटोशूट केले आहे.
View this post on Instagram
हे फोटो तिने सोशल मीडियावर चाहत्यांशी शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कृष्णा श्रॉफ काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तिचा हा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना वेड लावत आहे. या फोटोंमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
View this post on Instagram
तिच्या या फोटोंना 4 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. कृष्णा श्रॉफ इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. कृष्णा श्रॉफही फिटनेसच्या बाबतीत बड्या अभिनेत्रींना टक्कर देते. आपल्या भावाप्रमाणेच कृष्णालाही फिटनेसची खूप आवड आहे.
View this post on Instagram
आता कृष्णा श्रॉफ पुन्हा एकदा फोटोंमुळे चर्चेत आली आहे. दरम्यान, कृष्णाचा फॅशन सेन्स अप्रतिम आहे. ती कधी बोल्ड तर कधी सेनश्युअस अवतारात दिसते. कृष्णा श्रॉफदेखील एक फिटनेस फ्रीक आहे. आणि हे तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून देखील दिसून येते.