मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना गेल्या आठवड्यात करोनाची लागण झाली होती. राज ठाकरे यांना सौम्य लक्षणे असल्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात आले.
दरम्यान,त्यांची आज केलेल्या चाचणीमध्ये ते कोरोनामुक्त असल्याचे समजते आहे. राज ठाकरे यांच्यासोबतच त्यांच्या आईंलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची सुद्धा आज करोना चाचणी करण्यात असून त्या देखील कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. जलील परकार यांनी ही माहिती दिलीय.