असिनच्या बेडरूममध्ये सलमानचे फोटो

अभिनेत्री असिनने आमिर खानसोबत बॉलीवूडमध्ये डेब्यू केले होते. तिने “गजनी’ चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पाउल ठेवले होते. हा चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. यानंतर असिनला हिंदी चित्रपटांमध्ये मागणी वाढली होती. परंतु तिने कायम दक्षिण भारतीय भाषांमधीलच चित्रपटांना प्राधान्य दिल्याने ती खूपच कमी हिंदी चित्रपटांमध्ये झळकली.

असिनने भलेही आमिरसोबत पहिला चित्रपट केला. परंतु ती आमिर नव्हे तर सलमान खानची चाहती आहे. ती सलमानची एवढी चाहती आहे की, तिने चक्‍क आपल्य बेडरूममध्ये सलमानचे पोस्टर लावले होते.

जेव्हा असिनला सलमानसोबत “लंडन ड्रीम्स’ चित्रपटाची ऑफर मिळाली होती. तेव्हा तिला यावर विश्‍वास बसत नव्हता की, आपल्या फेवरेट स्टारसोबत चित्रपट साकारण्यास मिळणार आहे. या चित्रपटासाठी तिने तातडीने होकार दर्शविला होता.

“लंडन ड्रीम्स’चे बहुतेक शूटिंग आउटडोर झाले होते. ज्यामुळे कलाकारांना एकमेकांसोबत एकत्रित राहण्यास वेळ मिळाला होता. याप्रसंगी असिन आणि सलमान यांची चांगली मैत्री झाली होती. दरम्यान, सलमानने असिनला मुंबईत एक घरही गिफ्ट दिल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.