टॉप-10 सुपरमॉडल्समध्ये उर्वशी रौटेला

बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौटेलाला मोठे यश मिळाले आहे. ग्लॅमर जगतात प्रसिद्ध असलेल्या ई-वेबसाइट टाइम्स पेजेंट्‌सच्या जागतिक टॉप-10 सुपरमॉडल्समध्ये उर्वशी रौटेलाच्या नावाचा समावेश आहे. यात इरीना शाय्क, सारा पिंटो संपाओ यासारख्या सुपर मॉडल्सचाही समावेश आहे.

 

उर्वशी रौटेला ही “मिस टीन इंडिया’, “मिस एशियन सुपरमॉडल इंडिया’, “इंडियन प्रिन्सेस’, “मिस क्वीन ऑफ दी इयर इंटरनॅशनल इंडिया’, “मिस टूरिझम क्वीन ऑफ द इयर इंटरनॅशनल वर्ल्ड’ अशी अनेक पुरस्कार पटकाविले मॉडेल आहे.

 

उर्वशी बॉलिवूडमध्ये बऱ्याच दिवसांपासून सक्रिय आहे. परंतु आतापर्यंत तिला चित्रपटात अपेक्षित यश मिळालेले नाही. परंतु आता यश त्यांच्यापासून फारसे दूर नसल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, उर्वशी सोशल मीडियावरही खूप ऍक्‍टिव्ह असते. ती सतत आपले फोटो चाहत्यांशी शेअर करत असते.

वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास उर्वशी अखेरच्या वेळी “व्हर्जिन भानुप्रिया’ चित्रपटात झळकली आहे.उर्वशीने अलीकडेच जिओ स्टुडिओबरोबर तीन चित्रपट केले आहेत. याशिवाय ती “ब्लॅक रोज’ नावाचा चित्रपटही करत आहे. तसेच एका तमिळ चित्रपटही ती काम करत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.