पुणे – गणेशोत्सव आणि त्यातील देखावे हे समीकरण वर्षानुवर्षे चालत आहे. प्रबोधन आणि मनोरंजन हे मुख्य दोन हेतू त्यामागे आहेत. बदलत्या काळात या देखाव्यांनी आपले रूप बदलले असले, तरी त्याची लोकप्रियतादेखील तितकीच वाढली आहे. यंदाही शहरातील विविध मंडळांनी आकर्षक आणि भव्य देखावे सादर केले आहेत. तर, काहींनी नाट्यरूपी संवाद सादरीकरणावर भर दिला आहे. यात प्रामुख्याने ऐतिहासिक प्रसंगांवर आधारित देखावेदेखील लोकप्रिय ठरत आहेत. त्यातील काही देखाव्यांची छायाचित्रे खास “प्रभात’च्या वाचकांसाठी…