मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री नताशा स्टॅनकोविच ही तिच्या चित्रपटांपेक्षा भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याशी असलेल्या संबंधांमुळे चर्चेत असते. हार्दिकने नताशाशी साखरपुडा करून सर्वांना चकित केले होते.
आता हार्दिक पांड्याने आणखी एक गुड न्यूज शेअर केली आहे. नताशा लवकरच हार्दिकच्या मुलाची आई होणार आहे. हार्दिक पांड्याची प्रेयसी नताशा स्टॅनकोविचने नुकतेच बेबी बंपसोबतचा फोटो शेअर केला आहे.
यापूर्वी देखील हार्दिकने एक भावनिक पोस्ट देखील लिहिले आहे. त्याने लिहिले आहे की, नताशा आणि माझा एक खूपच सुंदर असा प्रवास सुरू आहे आणि तो आणखी चांगला होणार आहे. आम्ही लवकरच एकाला नवीन जीवाला जन्म देणार आहोत. तर नताशाने तिच्या बेबीशॉवरचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.