शिरूरमध्ये 34 हजारांचा दंड वसूल

शिरूर -लॉकडाऊन व करोना संसर्ग या काळात शासनाने घालून दिलेल्या अटींचा भंग करणाऱ्या शिरूर शहरातील 4 दुकानांवर तर 169 दुचाकी मोटरसायकल चालकांवर बुधवारी (दि. 15) कारवाई करीत 34 हजार 100 रुपयांचा दंड वसूल केला.

यासाठी शिरूरच्या तहसीलदार लैला शेख, पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे व नगर परिषद मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी रस्त्यावर उतरून नागरिकांवर कारवाई केली. त्यामुळे शिरूर शहरातून या तीनही अधिकारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.

शिरूर शहरामध्ये करोनाचा संसर्ग वाढू नये, याकरिता नगरपालिका महसूल, पोलीस प्रशासन यांनी संयुक्‍तपणे नियम तोडणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. शिरूर शहरात तीन ठिकाणी झालेल्या या कारवाईत मास्क न वापरणे, दुचाकीवर डबल सीट, सोशल डिस्टन्सिंग, दुकानात गर्दी करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली.

स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय बर्गे, आयुब सय्यद, रवींद्र वारे, साळुंखे, मुकादम बाळासाहेब साळवे, मनोज अहिरे, सागर कांबळे व पोलीस प्रशासन यांनी शहरातील विविध भागात कारवाई करून नियम मोडणाऱ्यांना चांगला धडा शिकवला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.